🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - १८७
आपला जन्म नाम घेण्याकरताच आहे. तेच घेतले नाही तर काय उपयोग? प्रपंच नामाकरता आहे.
विद्या, वैभव वगैरे प्रारब्धाप्रमाणे येतात. स्मरण मात्र कर्तबगारीचे आहे.
आपली सर्व फळे अपुरीच असतात. देव कितीही नवसाला पावला तरी काहीतरी राहणारच.
नवसात देवाचे अस्तित्व मानलेलेच असते. पण ते तेवढ्यापुरतेच असते.
भगवंत कल्याणाचेच करील. त्याने दिले नाही तर देवपण गेले असे न वाटावे. भगवंताच्या विश्वासावर स्वस्थ व धीराने असावे.
भगवंताच्या इच्छेने राहिले तरच धीराने राहता येईल.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment