14 Mar 2025

 🌸  श्रीराम समर्थ 🌸


 अमृतधारा - १५४


माझ्यावर प्रेम करायचे असेल तर नामात रहा. नामात राहणे हे माझ्यावरील प्रेमाचे चिन्ह आहे. नामात न राहता इतर केलेत तर उपयोग नाही. पण नामात राहून थोडे केलेत (तरी) पुष्कळ उपयोग होईल. नामात राहणे ही माझ्यावरील प्रेमाची खूण आहे.


सर्वांनी धर्माचा आचार-विचार सांभाळावा. नीती प्राणाबरोबर सांभाळावी, राखावी  व अखंड प्रेमात रहावे. 


जगाच्या व्यवहारात "माझे मी सांभाळीन" हे कठीण आहे.


प्रपंचात, धंद्यात राहून भगवंताकडे थोडे तरी लक्ष देणे हे कौतुकाचे आहे.


नामाचा अनुभव मागणे म्हणजे त्याच्या किमतीचा दुसरा पदार्थ आहे असे समजणे होय. पण नामाला किंमत किंवा मोबादला नाहीच. नाम म्हणजे भगवंतच होय.


नाम उपाधीरहित असल्यामुळे आपणही उपाधीरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही. जो माझा त्याला नामाचे प्रेम असेलच पाहिजे.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: