15 Mar 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - १५५


बाहेरच्या ज्या गोष्टीची मला गोडी असते, ती माझ्यावर बिंबते.


माझ्या (पारमार्थिक) हिताच्या काय आड येते?  (त्याचे) माझ्यावर परिणाम होतील की काय? ते पाहून सावधानता सांभाळली पाहिजे.


सावधानता बाकी वेळेस असते. प्रसंगाचे वेळी विसर पडतो (म्हणून) सर्वत्र सावधगिरी सांभाळावी.


कर्माचे बंधन टाळून कर्म केले पाहिजे. बंधन दोन प्रकारचे  -

कर्तेपणा व फलापेक्षा.


हेतू ठेवला तरी फळ होईलच (मिळेलच) असे न ठेवावे.


तसे कर्तेपण खरे नाही, मी अमुकच करीन हे खरे नाही. म्हणून "रामकर्ता"  म्हटले तर बंधन नाही.


मग कर्माचे सुख-दुःख नाही, कर्तेपणाचे(ही) नाही.


 "कर्ता राम म्हणावे" आपले कर्तेपण हे निश्चयात्मक नाही. खात्रीचे नसलेले कर्तेपण मिरवावे कशाला?


आशिर्वाद

🌹🌹🌹

No comments: