🌹💧श्रीराम समर्थ💧🌹
अमृतधारा - ९०
व्यवहारीक कर्मे करावी पण भगवंतासाठी करतो ही बुध्दी ठेवावी. प्रत्येक कृती त्याचीच सेवा होईल.
आनंद भगवंताजवळ आहे. सर्व गोष्टी भगवंताच्या इच्छेने घडतात. भगवंत दयाळू आहे. तो सर्वांचा कर्ता आहे.
तो आपल्या कल्याणाचे करील हे निश्चित कळले तरच आनंद अनुभवास येईल.
मीपणा नाहीसा झाला की प्रसंग येईल, पण जाणवणार नाही.
मी कर्ता नाही राम कर्ता आहे. तो आनंदरूप आहे म्हणून सर्व चांगलेच करतो. मला जर ते वाईट लागले तर दोष माझ्यात आहे.
तो करतो ते चांगलेच करतो. मग सुखदुःख वाटणे नाहीसे होईल.
हीच आनंदाची अवस्था होय. जे घडते ते कल्याणाचेच वाटल्यावर दुःख नाही.
त्याकरिता नामस्मरणाची जरूरी आहे. हाच उपासनेचा हेतु आहे.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment