17 Jan 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


    अमृतधारा - ९८


सृष्टी भगवंताने निर्माण केली म्हणून तो स्रष्टा. तो स्रष्टा कसा? तर तो आनंदरूप आहे. आनंदरूपाची सृष्टी आनंदरूपच पाहिजे. 


मग सृष्टी कडू का लागते? जगात वस्तु साकार झाली की द्वैत आलेच.


द्वैत प्रपंचाचे मूळ आहे. त्याशिवाय प्रपंचच नाही. मग तेथे दुःख अटळच आहे. 


भगवंतच सर्व करतो. प्रपंचाची घडामोड तोच करतो. ती घडामोड वाईट वाटली, त्याचे कारण स्वार्थ. स्वार्थ द्वैतमूलक असतो.


आपल्याला द्वैत निर्माण करण्याची हौस आहे. द्वैत दुःख देते ते विसरले की समाधान होते. 


म्हणून भगवंत धरला की आनंद मिळेलच.


आशिर्वाद.

No comments: