16 Jan 2025

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


    अमृतधारा - ९७


प्रपंचाचा पसारा पाहून मोठमोठे गुंततात पण जे गुंतत नाहीत ते फार भाग्याचे होत.


बायको मुलांची जबाबदारी वगैरे तितकीशी खरी नाही. आपण आपलीच फसवणूक करून घेत असतो. 


बायको मुलांकरता आपण तळमळ करतो ती स्वार्थाकरताच असते. निरपेक्ष तळमळ किती लोकांचे ठिकाणी सापडेल? विचाराने वागणे हेच खरे भूषण आहे. 


मनुष्याला तळमळीशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. त्या तळमळी करताच सर्व साधने आहेत. 


तळमळ उत्पन्न होण्याकरता भगवंताचे नाम घ्यावे.


आशिर्वाद

No comments: