🍁💧श्रीराम समर्थ💧🍁
अमृतधारा - ७३
खरे म्हणजे मला काही नको. पण मायेने हवेपण इतके निर्माण केले की जीव वासनेत अडकला गेला.
जीवनात हेतुरहित राहणे अशक्य, पण त्यात सुख आहे (मिळते) असे मानू नका.
कोणतीही वस्तू मिळून सुख होते असे नाही, न मिळूनही अडत नाही.
नाही त्याचा पश्चात्ताप नको, आहे त्याचा अभिमान नको.
आपण सहज झाले पाहिजे. पण माझे कर्तेपण सहजपणाच्या आड येते.
"परमेश्वराच्या इच्छेने सर्व होते" ही वृत्ती झाली तर सहजपण येते. ती वृत्ती होण्यासाठी नाम हेच सर्व श्रेष्ठ साधन आहे.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment