🍁💧श्रीराम समर्थ💧🍁
अमृतधारा - ७४
मी पणाची वृत्ती नाहीशी करण्याकरता तू पण वाढवले पाहिजे. मग मी पणा कमी होत जातो.
हवेपणात आग्रह नको, घडेल तसे राहण्याची वृत्ती केली पाहिजे.
परमार्थ सोपा आहे हवेपणाने त्यास अवघडपणा आला.
सहजपणाने राहणे यात समाधान आहे.
आहे ती स्थिती भगवंताने दिली म्हणावे व स्मरण ठेवावे, मग इतर काहीही करावे.
"तू ठेवशील तसा राहीन- तुझ्या नावाने कर्तव्य करीन व तुझे अनुसंधान ठेवीन " हाच परमार्थ.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment