6 Dec 2024

 💧🍁श्रीराम समर्थ🍁💧


    अमृतधारा - ५१


अमक्यामध्ये सुख आणि कल्याण आहे अशी कल्पना ठेवू नये. कर्तव्यात राहावे व निष्ठा ठेवावी. 


मुलेबाळे होणे त्यांची जोपासना करणे, हेच केले तर काय मिळवले? पशुपक्षी तेच करतात. 


आपले ध्येय उच्च असले पाहिजे. आपण पोराबाळांकरता जन्माला आलोच नाही असे म्हणू.


सर्व विषयप्रेमाचे मूळ देह आहे. देहबुद्धी आहे, देहावर प्रेम आहे म्हणून जगावर प्रेम आहे. ते सुटले नाही तोपर्यंत जगाची आसक्ती जाणार नाही. 


जो जगाची आसक्ती वाढविल त्याला भगवंताची प्रीती कशी येईल? 


आपण भगवंत हवा म्हणतो व देहबुद्धी वाढवतो. जितका देह आपण मानतो तितका देव मानला पाहिजे. 


आपण देव तितका मानला तर देहप्रेम तितके राहणारच नाही. हे देहत्यागाने किंवा देह कष्टाने होत नाही. 


म्हणून जे नाही त्याबद्दल हवेपणाची वृत्ती नको व जे आहे त्याची फिकीर बाळगू नये.


आशीर्वाद.

No comments: