6 Dec 2024

 श्रीराम समर्थ 


     अमृतधारा - ५०


कोणत्याही गोष्टीचे वा कृतीचे मूल्यमापन त्याच्या मागील हेतूवर अवलंबून असते. 


हेतू अशुद्ध असेल तर बाह्यतः कृती चांगली असूनही ते कर्म निकृष्ट ठरेल. पण हेतू शुद्ध असेल तर कृती तितकी चांगली दिसली नाही तरी हरकत नाही. 


डाॅक्टरने शस्त्रक्रिया केली व त्यात रोगी दगावला तरी बरे करण्याचा हेतू असल्याने त्याच्याकडे दोष येत नाही. 


पण रावणाने शिरे अर्पण करण्यापर्यंत भक्ती केली तरी त्रैलोक्यावर स्वामित्व गाजवता येण्याच्या हेतूने केली. परदाराभिलाषासारखे पातक करून नाश करून घेतला. 


परमेश्वराच्या राज्यात आपला हेतू लपवून ठेवता येत नाही. 


मानवी कोर्टात सत्याअसत्याचा निवाडा होत नसून पुराव्याचा होतो पण देवाच्या राज्यात मनातील हेतू ओळखून निवाडा केला जातो. 


म्हणून भक्ती करताना फळ भगवंत पाहिजे असेल तर हेतू शुद्ध असला पाहिजे. हेतू शुध्द कोणता तर ज्यात भगवंताशिवाय इच्छा नाही.


अंत:करणाचे पावित्र्य पाहिजे. कोणाचाही द्वेष करू नये. सर्वच भगवंताची रूपे आहेत तर द्वेष कोणाचा करावा? तो केला तर भगवंत कसा प्रसन्न होणार?


भक्ती शुद्ध हेतूने करावी म्हणजे त्याचे फळ भगवंत मिळेल. 


आशीर्वाद

🌸☘🌼

No comments: