💦❗श्रीराम समर्थ❗💦
अमृतधारा - ०६
भगवंताच्या स्मरणात कर्म करणे हिच नीती होय. भगवंताचे विस्मरण झाल्याशिवाय अनीती होणार नाही. माझ्या कृतीला भगवंत पाहतो या भावनेने वागावे.
कर्म काही सुटत नाही. अभिमानाचे कर्म बंधनाला कारण होते. मग कर्म करुनही कर्म मारता कसे येईल ?
कर्म बंधन नाहीसे करायला तीन मार्ग आहेत
1) कर्ता मी नाही. बुध्दी व कर्तुत्व भगवंताचे आहे. त्याने मला शक्ती दिली म्हणून मी कर्म करतो. आपण आरोपी म्हणून कर्म न करता साक्षीदार म्हणून कर्म करावे.
2) जसे फणसाचा चीक टाळायला हाताला तेल लावतात, तसे प्रत्येक कर्मात भगवंताचे अनुसंधान ठेवून ते कर्म करावे.
3) कोणतेही कर्म देवाला
अर्पण करावे.
द्वैतबुध्दी नाहीशी व्हायला
या पध्दतीने कर्म करावे.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment