18 Oct 2024

 💦❗श्रीराम समर्थ❗💦


अमृतधारा - ०७


खरा मी म्हणजे देह नव्हे. पण देह माझा म्हणताना  "मी देह" असे म्हणतो व

 वागतो. मी देह आहे हे  एक टोक व मी तो आहे हे दुसरे टोक. 

जितके एकीकडून दूर, तितके दुसरीकडे जवळ. हे जवळपण सहवासाने आले.

सहवासाने मी जसा देह झालो तसा भगवंत कां होणार नाही? नामस्मरण हे त्यासाठी आहे. देहाचा विसर पडायला दुसर्‍याचा आठव पाहिजे. सर्व मार्ग त्यासाठी आहेत.

मी चोवीस तास भगवंताचाच    आहे. मी जन्मापूर्वी त्याचा होतो, मागून त्याचाच होणार.

मग मध्ये मी त्याचाच असलो पाहिजे हे असे अनुसंधान पाहिजे.

आशीर्वाद.

🌷☘💧


No comments: