28 May 2025

प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज

   

२८ मे

प्रपंच भगवंताचा मानून करावा.


१.
प्रपंच भगवंताचा मानून करावा.
Consider worldly life as belonging to God and perform your duties accordingly.


२.
अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य.
Not desiring one specific thing or rejecting another — that is called detachment.


३.
संकटकाळी, हे संकट नसावे असे न वाटता, परमेश्वराचे स्मरण असावे आणि त्याच्याजवळ हे मागावे की, 'देवा तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नको.'
In times of crisis, instead of wishing the trouble wasn’t there, remember God and pray, “O Lord, don’t even give me the desire to ask anything from You.”


४.
देहाला मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जेव्हा ते आपोआप येतात, तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत.
One should not deliberately cause hardship to the body, but if hardships come on their own, they should be endured joyfully.


५.
पुरूरव्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले; तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य ?
Pururava committed a sin, and through that he attained detachment — should that then be called a sin or a good deed?


६.
तरीही, वैराग्यप्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नव्हे हे खरेच.
Even so, truly, this is not the right way to attain detachment.


७.
आपण शास्त्रविरुद्ध कर्म करू नये. आणि दुसर्‍याने केले तर नावे ठेवू नयेत.
We should not act against the scriptures. And if someone else does, we should not blame them.


८.
न जाणो, परमात्म्याची इच्छा असेल तर त्यातूनच चांगले होण्याचा संभव आहे.
Who knows, if it is God’s will, even that may lead to something good.


९.
प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असे वाटण्यात काय अर्थ ?
If you believe worldly life is false, what is the point in judging which illusion is better?


१०.
तो जसा असेल तसा असू द्यावा.
Let it be as it is.


११.
नाटकात नट जसे काम करतो, त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावे.
Just as an actor performs a role in a play, so too should we perform our role in worldly life.


१२.
तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही; सद्‍गुरूच तो तुमच्याकरिता करीत असतात; तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये.
Even your spiritual progress is not in your hands; your Sadguru does it for you — so don’t worry about anything.


१३.
जे होईल त्यात आनंद मानीत राहावे.
Whatever happens, accept it with joy.


१४.
सद्‍गुरुदर्शनाने पूर्वकर्मे, पापे, जळून जातात.
By the sight of the Sadguru, past karmas and sins are burnt away.


१५.
तुमची पुढची काळजी सद्‍गुरू घेतात.
Your future is taken care of by the Sadguru.


१६.
तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसून नये आणि काळजी करू नये, समाधानात आणि आनंदात असावे.
So do not dwell on the past or worry — stay in peace and joy.


१७.
प्रपंच देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ.
Considering worldly life as God’s and performing it without ego — that is spirituality.


१८.
परमेश्वराचे स्मरण ठेवून तोच कर्ता आहे असे मानणे, आणि सर्व काही त्याच्याकरिता करणे, म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखेच आहे.
Keeping God in mind and believing He is the doer, and doing everything for Him — is as if offering it all to God.


१९.
फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णार्पण म्हणणे, म्हणजे इतर वेळ त्याला विसरला असे नाही का होत ?
If you say “Krishnarpanam” (offering to Krishna) only at the end of your action, isn’t it as though you forgot Him the rest of the time?


२०.
देवापाशी 'मला तू आपला म्हण. हे मन तुझ्या चरणी अर्पण केले. मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो.' असे मागावे.
Pray to God, “Call me Yours. I offer this mind at Your feet. Let me not even have the desire to ask anything from You.”


२१.
नाही तर, जो राज्य द्यायला समर्थ आहे त्याच्याजवळ केरसुणी मागितल्याप्रमाणे होईल.
Otherwise, it will be like asking for a broom from the one who is capable of giving a kingdom.


२२.
भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो.
Pray to God with all your heart — He shows us the right path.


२३.
आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो.
When walking in darkness, even a flash of lightning shows us the entire path ahead.


२४.
त्याचप्रमाणे, मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते.
Likewise, if we sincerely remember God, we naturally come to know the way ahead.


२५.
'तू जे देशील ते मला आवडेल,' असे आपण भगवंताला सांगावे, आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे.
Say to God, “Whatever You give me, I will like it,” and keep unbroken remembrance of Him.


२६.
यापेक्षा भगवंताजवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार ?
What other way could there be to reach God than this?


२७.
ज्याच्या प्रपंचामधे पाठीराखा परमात्मा आहे, त्याचा तोच परमार्थ होतो; ज्याचा पाठीराखा अभिमान आहे तो प्रपंच समजावा.
He whose worldly life is backed by God — his life itself becomes spiritual; but if ego is the support, then it is only worldly.


२८ मे – श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचनाचा सारांश
Summary of May 28 – Discourse by Shri Brahmachaitanya Maharaj


 सारांश :

  • वैराग्य म्हणजे काय?
    अमुक हवे किंवा नको असे वाटणे नसो, हीच वैराग्याची खरी ओळख आहे.

  • संकटातही भगवंताचे स्मरण:
    संकट टाळण्याची अपेक्षा न ठेवता, भगवंताला अशी इच्छा मागावी की काहीही मागण्याची इच्छा उरू नये.

  • कष्टांचे स्वागत:
    देहाला कष्ट देऊ नयेत, पण आलेल्या कष्टांना आनंदाने स्वीकारावे.

  • दुसऱ्यांवर टीका नको:
    कोणी चुकीचे कर्म केले, तरी त्याच्यामागे भगवंताची योजना असू शकते.

  • प्रपंचाला नाटकासारखे मानावे:
    जसे नट भूमिका करतो तसे प्रपंचाचे कार्य करावे, त्यात गुंतायचे नाही.

  • सद्गुरूवर विश्वास:
    परमार्थ आपल्या हाती नसतो, तो सद्गुरू करतात. त्यांच्या कृपेने पापे जळून जातात.

  • प्रपंच भगवंताचा मानून करावा:
    अभिमान न ठेवता, सर्व कर्म भगवंताला अर्पण करण्याची भावना असावी.

  • खरा भक्त:
    जो प्रपंचातही सतत भगवंताचे स्मरण करतो, तोच खरा भक्त.

  • प्रार्थना कशी असावी?
    'देवा, मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा राहू नये' – अशी प्रार्थना करावी.

  • उदाहरण:
    अंधारात एक क्षण वीज चमकते आणि संपूर्ण वाट दाखवते; तशी भगवंताची कृपा.

  • सार:
    ज्याच्या प्रपंचामागे परमात्मा आहे, त्याचेच जीवन परमार्थमय असते.


English Summary:

  • What is detachment (vairagya)?
    Not wishing for anything specifically is true detachment.

  • In times of difficulty:
    Instead of wishing for troubles to go away, pray to God not to have the desire to ask for anything.

  • Welcoming suffering:
    Do not inflict pain deliberately, but bear natural hardships cheerfully.

  • Avoid judging others:
    Even seemingly wrong actions by others may be part of God's plan.

  • Worldly duties like a drama:
    Just as an actor performs a role, live in the world without attachment.

  • Faith in the Sadguru:
    Our spiritual progress is guided by the Sadguru. He burns our past sins.

  • Do all duties as God’s:
    Perform all actions without ego, offering them to God.

  • True devotion:
    One who remembers God even in worldly life is the true devotee.

  • How to pray?
    Ask God: “Please do not let me desire anything from You.”

  • Example:
    A flash of lightning shows the path ahead—similarly, true remembrance of God reveals the way.

  • Essence:
    One whose worldly life is backed by God—that is true spiritual life.

No comments: