🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - १९६
"मी सांगतो म्हणून कर" असे कोणीच सांगत नाही, पण पटले तरच कर म्हणतात. तुम्ही पुष्कळ असे ऐकले. पण, घेतले, आचरणात आणले नाही तर काय उपयोग?
साधन ज्याने जसे सांगितले तसे बरोबर करावे व फळाकडे लक्ष न देता करावे.
समजते तितके साधन केले की पुढचा मार्ग दिसतो. समजून घेण्याने जरूरी वाढते.
बुद्धी दिली आहे. ती वापरली पाहिजे. ती भगवंत बदलत नाही. ती आपणच बदलली पाहिजे.
माणसाने कल्याण करून घ्यावे म्हणून भगवंताच्या डोळ्याला पाणी येत असेल.
प्रपंच सोडू नका पण भगवंताचे स्मरण ठेवा.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment