3 Apr 2025

 🌸  श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - १७४


भगवंताचे दास्य करायला जगाची आस सोडावी लागते. पण ते कठीण म्हणून दास्य करावे म्हणजे आस जाईल.


देहाने सर्वस्वाने त्याचे होऊन रहावे व मनाने स्मरण करावे.


जो स्वतःचा मालक होईल तोच भगवंताचा होईल. जो विकार ताब्यात आणील तो आपला मालक होईल.


विकारांना ताब्यात आणण्यासाठी विद्येचा उपयोग नाही. धर्म व निती यांचे आचरणच विकारांना ताब्यात आणेल.


बाहेरची परिस्थिती असेल तसे कर्तव्य करावे आणि मनात समाधान टिकवावे.


अत्यंत धर्माने वागा. कर्तव्याला चुकू नका व नाम सोडू नका.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: