🌸 श्रीराम समर्थ 🌸
अमृतधारा - १५७
प्रत्येकाला फळ चांगलं मिळावे, तसा जीवनाचा शेवट गोड व्हावासा वाटतो.
गोड शेवटासाठी सुरवात चांगली होऊन ती पुढे (शेवटपर्यन्त) टिकली पाहिजे.
आपण मनुष्य जन्माला आलो ही सुरवात चांगली झाली.
थेंब थेंब केले तर शेवट गोड होईल.
सकाळी प्रथम नाम घ्यावे. अंतर्यामी इतकी वृत्ती व्हावी की भगवंताची सारखी आठवण व्हावी.
बायकांनी तरी करावे. त्यांना एकावर लक्ष देऊन कर्म करायची सवय असते.
पतीची सेवा भगवंताकरिता उपयोगी आहे.
प्रपंच सुखाचा व्हावा हीच परमार्थाची खुबी आहे.
प्रपंचात "राम" घाला म्हणजे प्रपंच खरा सुखाचा होईल.
आशीर्वाद.
🌹🌹🌹
No comments:
Post a Comment