31 Mar 2025

 🌸 श्रीराम समर्थ 🌸


    अमृतधारा - १६२


वासना तृप्ती होण्यात खरे समाधान नाही. वासना नाहीशी होणे खरे समाधानाचे आहे. ते करताना व्यवहार अंगावर न येता तो केला पाहिजे.

   

आपण देवाला स्मरूण कर्तव्य करावे. पण व्यवहाराचा मनावर परिणाम होऊ देऊ नये.


दुसर्‍याचे वाईट तरी म्हणू नये. हा स्वार्थच आहे. आपला थोडा तरी स्वार्थ आहे असला म्हणजे व्यवहाराचा परिणाम होतो.


व्यवहाराला धरून प्रयत्न व मनाने भगवंताची निष्ठा ठेवली तर प्रपंच व परमार्थ साध्य होईल व घरात समाधान येईल. 


आपली निष्ठा प्रपंचापेक्षा देवावर कमीच असते व तो पावला नाही म्हणजे आणखी कमी होते.


भगवंत पाठीराखा होईलच. भगवंत आजही तोच आहे. फक्त निष्ठा पाहिजे.


आशीर्वाद.

🌹🌹🌹

No comments: