💧❗श्रीराम समर्थ❗💧
अमृतधारा - १२३
पुष्कळ मोठ्यांना उपासनेचा उद्देश कळला नाही. मनुष्यत्वाचे कर्तव्य म्हणून उपासना करायला हवी. उपासनेचे बाह्यांग फार वाढवू नये.
बाह्यकर्माला खरे महत्व नाही. एखादा मनुष्य भगवंताच्या स्मरणात नोकरी करील तर ते कर्म भक्तीरूप होईल. याउलट एखादा मनुष्य भगवंताच्या विस्मरणात पूजा जरी करील तर ती भक्ती होणार नाही.
तुलसीपत्र घातले तरी पुरते.भगवंताचे नाम घ्यावे. जो भगवंताच्या स्मरणात राहील, त्याला नेहमी आनंदच राहील. तो खरा भाग्यवान.
आनंदाला कारण लागत नाही. आपण कारणाशिवाय राहावे. आपला आनंद आपणच भोगला पाहिजे.
निश्चय एका मिनिटात होतो. म्हणून मी भगवंताचा आहे म्हणून राहावे, नामस्मरण करावे. आनंदात राहावे.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment