💧🍁श्रीराम समर्थ🍁💧
अमृतधारा - ५७
काळजी घेणे हे कर्तव्य व त्यात भगवंताचे स्मरण करणे हा परमार्थ.
राम कर्ता ह्या भावनेने कर्तव्य करावे. मग आनंदाला ऊत येईल. मग तेथे भगवंत आहेच. त्या भावनेकरता (राम कर्ता ) स्मरण करावे.
प्रपंच आनंदाचा होऊन परमार्थ होतो. ज्याचा परमार्थ मिंधा तो बरा नाही.
प्रपंच सर्वत्र धाग्यादोरांनी बांधलेला आहे. त्यातून जो बाहेर पडतो त्याचा प्रपंच विस्कळीत होतो.
जगणे हे भगवंताकरता. जगण्यापुरता प्रपंच.
प्रपंचात घडोघडी अभ्यास शक्य आहे. नाना प्रसंग त्यात आहेत म्हणून तो परमार्थाकरता उत्तम.
प्रत्येकात भगवंत दिसला पाहिजे. तशी वृत्ती पाहिजे. बाह्य ज्ञानाने अंतरंग सुधारणार नाही.
त्याला (भगवंताला) आवडेल तेच करीन असा निश्चय करावा. त्याच्या इच्छेने आपण राहू मग चेहर्यावर परिणाम दिसेलच.
दारूचा मद दिसतो मग ईश्वराच्या भक्तीचा कां दिसू नये.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment