🍁💧श्रीराम समर्थ💧🍁
अमृतधारा - ६३
ज्या गोष्टी झाल्या, होताहेत व होणार (आहेत) त्यात भगवंताचा हात दिसला पाहिजे.
हा दुबळेपणा नाही ही मोठी शक्ती आहे. फळाच्या आशेवर माणसाला बळ येते. पण फळाबद्दल निरिच्छता ठेऊन वागणे बलवानाचे काम आहे.
विषयावर मायेचा पगडा आहे तो जाण्याकरता भगवंताचा पगडा पाहिजे. म्हणून गोष्टी होताना काळजी नाही व झाल्यावर फिकीर नाही.
जे घडेल, दिसेल त्यात भगवंत दिसला पाहिजे. तो दिसला की लिनता आलीच.
ग्रंथाचा खरा अर्थ शब्दाने कळतो. तरी त्याचा खरा अर्थ शब्दापलीकडेच असतो.
साधनात राहील त्याला तो समजतो. साधन व जितके पवित्र अंतःकरण असेल तितका, (व) ज्याला जितका जरूर तेवढाच अर्थ त्याला समजतो.
विद्वानाला शब्दातील अर्थ समजतो. त्याला समजतो, पण जो साधनेत राहील त्याला अगोदरच समजतो.
म्हणून साधनेत राहून ग्रंथ वाचावेत.
सांगणाऱ्याला महत्त्व नाही, भावनेला आहे. सांगणाऱ्यानी सांगून ठेवले आहे, पण भावनेने करणाऱ्यालाच फळ मिळते.
आशीर्वाद.
No comments:
Post a Comment