9 Nov 2024

 🌷☘ श्रीराम समर्थ🌷 ☘


  अमृतधारा - २९


नामाने खरे समाधान होते.  नामाने काय होते हे म्हणण्यापेक्षा ते घेऊन पाहावे. नामात प्रेम आल्यास कसेही असले तरी चालेल. किंबहुना रामावाचून राजवाडा वाईट आहे. पण राम असेल तर  झोपडीही चांगली. 


सूर्य उगवला खरा, पण जन्मांध माणसाला प्रकाश दिसत नाही. तसे नामात राहूनही निष्ठेच्या अभावी तो जाणवत नाही. 


 निष्ठापूर्वक नामाची जरूरी आहे. नाम आहे तेथे भगवंत आहेच, पण ती भावना  पाहिजे. 


नामात राहावे. त्यात सर्व अनुभव येतील. काही आडकाठी येणार नाही.  काही झाले तरी नाम सोडू नका. नामाबद्दलची अस्तित्व बुध्दी ही संतांची खुण आहे.  


रामाचे वर्णन करता येईल पण नामाचे महात्म्य सांगता येणार नाही. नामानेच आजवर सर्व गोष्टी झाल्या आहेत. 


नामाने काय होईल असे म्हणू नये. आपण विषय चाखतो व नामाचा अनुभव मागतो. आजवर सर्व संतांनी भगवंताचे स्मरण मागितले. त्याला उत्तम साधन  नाम आहे. 


आशीर्वाद.

💧☘🌷

No comments: