6 Nov 2024

 🌼🍁 श्रीराम समर्थ🍁🌼


    अमृतधारा - २४


देह माझा आहे, पण  "तो"  मीच झाल्याने  घोटाळा झाला.  


देहाच्या सहवासाने त्याचे जे मित्र, विकार  ते बळावले.  प्रत्येकजण मी देही याच भावनेने व्यवहार करतो.  ते माझेपणाचे प्रेम कमी करण्याला, इतर आसक्ती कमी केल्या पाहिजेत.


फांद्या तोडून मग बुंधा तोडून टाकतात, तसे इतर आसक्ती सोडायला नीतीधर्माची बंधने आहेत. नीती हा पाया आहे. 


भगवंताला तीन गोष्टीचे वावडं (अ‍ॅलर्जी) आहे.

१) परस्त्री

२) परद्रव्य

३) परनिंदा

 

परस्त्री मातेसमान, परद्रव्य विष्ठेसारखे मानावे. पैशाला वासना सर्वात अधिक चिकटते. द्रव्यामध्ये चित्त सारखे गुंतते. पैशाने द्वेष, मत्सर, अहंकार येतात. 


परनिंदा नको. तो घरबसल्या बुडवेपणाचा धंदा आहे.  आपण दुसर्‍याचे कल्पनेने दोष पाहून बोलतो, त्याने दुसर्‍याचे नुकसान होत नाही आपलेच होते. 


ही तीन टाकून नाम घ्यावे. 


जीवाला भगवंतच पाहिजे.  त्याकरिता प्रयत्नाने प्रपंचात राहून नाम घ्यावे.


आशीर्वाद.

🌷🌼💧

No comments: