19 Nov 2024

 💧❗श्रीराम समर्थ❗💧


    अमृतधारा - ३७


चांगले व वाईट कळण्याची बुध्दी माणसाला आहे. 


पशूला पुढचे सुख कशावर आहे ते कळत नाही. ते माणसाला कळते. 


देहाच्या सुखाने समाधान मिळत नाही, हे माणसाला कळते. म्हणून देहाच्या सुखदुःखाने त्याने पालटू नये.


प्रपंचात चुकते कोठे ते पाहिले पाहिजे. दुसर्‍याने आपले अनहित केले तर पाहता येईल. पण आपले (अनहित) आपण केले तर काय करणार? 


जगात संकटे प्रारब्धाने  येतात व येतील. पण आपल्या कडून चुकले असे असू नये.


लोक काय म्हणतात त्यापेक्षा माझे मन काय सांगते ते पहावे.


वैभव ऐश्वर्य प्रारब्धाने प्राप्त  होते.


व्यवहारात प्रत्येकाला ओळखून वागावे. आता लबाडी फार वाढली आहे. पण आपण लबाडी करू नये. 


पुण्य असेल त्यालाच भगवंताचे स्मरण होईल. 


शेवटी नामाव्यतिरिक्त राहू नका, इतके माझे ऐका.


आशीर्वाद.

No comments: