🌷💧श्रीराम समर्थ💧🌷
अमृतधारा - ४०
जेथे समाधान मिळते ते घर आपले.
पैशाची गरज आहे, पण परमात्मा देईल तितकाच पैसा जरूर आहे. त्यापेक्षा अधिकाची हाव धरू नये. भगवंत देईल त्यापेक्षा अधिकाचा लोभ धरणे म्हणजे हाव होय.
जगात कोणीही समाधान देणारे नाही. देहाची नाती स्वार्थाची आहेत, ती देह सुख देतील. समाधान भगवंताच्या नात्यातच आहे.
मनुष्य स्वतःकडे पाहतो, जगाकडे पहातच नाही. उद्या तो उपयोगी पडेल म्हणून आज मदत करणे खरे नाही. कर्तव्य म्हणून मदत करावी. शरीर रक्षण भगवंताकरिता आहे.
प्राणाच्या खालोखाल ईश्र्वराची निष्ठा जतन केली पाहिजे.
पाहिजे तसे वातावरण येऊ दे, पण भगवंताचा हात सोडू नका. तो अंतर देणार नाही.
आपली वासना अफाट आहे. ती जाऊन भगवंताची तळमळ कशी लागेल ते पहावे.
ज्याची सुरवात चांगली ते कर्म चांगले, तसेच त्याचा शेवट चांगला होतो. रात्री झोपताना रामाला हाक मारून सर्व अर्पण करून स्मरणात झोपावे.
आशीर्वाद.
💧☘🌷
No comments:
Post a Comment