25 Nov 2024

 ॥ श्रीराम समर्थ॥


अमृतधारा - ४५


संगत धरणे आपल्या हातात आहे. ती मिळणेआपल्या हातात नाही. म्हणून संगत चांगली ठेवावी. संगतीचा परिणाम फार होतो. संगत

 पराधीन खरी, पण थोडेसे आपल्यावरही आहे. मला काय बनायचे

आहे तेच मला माहीत नाही.


नुसत्या सत्संगतीने उपयोग होतो. जो मरत नाही तोच संत होय.

येतो व जातो तो संत नाही. संताला जिवंत ठेवणे आपल्या हाती

आहे. देहाने चोवीस तास कोणाचीच संगत मिळणार नाही.


आपल्याला प्रपंचाचे जितके प्रेम, तितके ज्याला भगवंताचे प्रेम तो

संत होय. त्याला ओळखणे कठीण असते.


ज्याचा जो गुणधर्म तो त्यात असला तर ती वस्तू चांगली. आपण

अत्तर घेताना बाटलीवरून घेत नाही. अत्तराचा वास पाहून घेतो.

 तसेच संतांच्या बाबतीत आहे. आपण फसतो ही आपली चूक आहे,  फसवणाऱ्याची नव्हे. संत कळणे कठीण, पण ज्याच्या  सहवासात आपल्याला भगवंताचे प्रेम येते तो संत असला पाहिजे. आपणाकरता

आपण नाही, लोकांकरता आपण आहोत हा साधुचा गुणधर्म.


भगवंत कायम बरोबर असणे हे सत्पुरुषाचे रहस्य आहे.


आशीर्वीद

No comments: