💧❗श्रीराम समर्थ❗💧
अमृतधारा - ३३
देहाचा विसर (पडत) नाही तोपर्यंत आनंद नाही. "मी आनंद भोगतो" या मध्ये देहबुद्धी आहेच. "मी आनंद भोगतो" तोपर्यंत खरा आनंद नाही.
जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्हीमध्ये जो साक्षित्वाने राहतो तो मी असला पाहिजे.
तो मी देहभान व्यतिरिक्त आहे. ते स्वरूप देहबुद्धीने झाकले आहे. त्यातून सर्व रोग उत्पन्न होतात.
"मी देह आहे" हे एक टोक व "मी तो आहे" हे दुसरे टोक. "मी देह नाही" ही जाणीव म्हणजे मधली स्थिती.
ज्याच्याकडे जायचे, त्याचे होऊन राहिले पाहिजे. त्याकरिता सगुणोपासना हवी. त्याचे स्मरणात स्वतःचा विसर पडतो.
पहिली पायरी -
आचरण शुध्द असावे, त्याने अंतःकरण पवित्र होते.
दुसरी पायरी -
मग राम कर्ता ही भावना असावी. भगवंताच्या स्मरणात स्वतःचा विसर ही कृती घडते.
स्मरणात एकाग्रता आली तर उत्तम, पण नाही तरी स्मरण असावे.
विषयात आसक्ती असते म्हणून एकाग्रता होत नाही, पण हळूहळू ती होईल. आतील तीव्रता असेल तितक्या लवकर ती होईल.
आशीर्वाद.
🌷💧🌼
No comments:
Post a Comment