☘🍁श्रीराम समर्थ🍁☘
अमृतधारा १२
प्रत्येकाला आनंदमय व्हावेसे वाटते. तो आनंद भगवंताचा अंश आहे. आपण तो बाहेरून आणण्याचा प्रयत्न करतो. तेथे तो पाहिजे तसा मिळत नाही.
प्रत्येक जीवाची दुसर्याकडुन आनंदाची अपेक्षा असते. त्यामुळे बाहेरून आनंद मिळणे शक्य नाही. तसेच सुखाचे वाटेकरी अनेक असतात. म्हणून बाहेरून पूर्ण सुख मिळणे शक्य नाही.
दुसरा मला सुख देईल ही कल्पनाच चूक आहे. सुख आपल्यातूनच आले पाहिजे, परावलंबी सुख टिकत नाही.
टिकाऊ सुख भगवंताजवळ आहे. जगातील विद्वान श्रीमंत यापैकी सर्वस्वी सुखी कोणीच नाही.
खरे सुख बाहेर नसून आपल्या आतच आहे. आणि त्याला उपाय भगवंताचे स्मरण हाच आहे.
परमात्मा कर्ता ही भावना ठेवून कर्तेपणाचा अभिमान सोडून, कर्तव्य करणे हाच खरा प्रत्येकाचा धर्म आहे.
आशीर्वाद.
🔥💦☘
No comments:
Post a Comment