☘ श्रीराम समर्थ ☘
अमृतधारा - ०४
संगत फार महत्वाची आहे. तिचा परिणाम नकळत होतो.
संगत तीन प्रकारची आहे,
देहाची संगत -
ही कठीण असते कारण आपली साशंक वृत्ती असते.
सद्विचारांची संगत -
जपाला बसले तर विचार टिकत नाहीत. वृत्ती फार सुक्ष्म असल्याने ती केव्हा बदलते कळत नाही.
नामाची संगत -
प्रथम बळजबरी पाहिजे.
अभ्यासाने ती मुरली पाहिजे. तळमळ लागली तर नामाची संगत जमणारी आहे.
आपले अन्न व संगत बुध्दी चांगली होण्यास अनुकूल नाहीत. बाहेरच्या परिस्थितीचे संस्कार टाळण्यासाठी भगवंताचे स्मरण पाहिजे.
आपले मन केव्हा कुठे जाईल सांगता येत नाही. त्याला नामाच्या ताब्यात ठेवले तरच स्थिर राहील.
अगदी सावधगिरीने राहणे जरूर आहे. कोठून मनावर घाला येईल ही भीती वाटली पाहिजे.
आशीर्वाद.
🌷☘💧
No comments:
Post a Comment